*पंढरपूर रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपण*
पंढरपूर: प्रतिनिधी
रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी पर्यावरण सरंक्षणव संवर्धन यासाठी वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
उन्नत भारत अभियान व राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज अंतर्गत रोटरी क्लब पंढरपुर यांच्या संयुक्त उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन होऊ सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता कोर्टी (ता.पंढरपूर) येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या परीसरात रोटरी क्लबचे पदाधिकाऱ्यांसह, सिंहगडचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या प्रकारची ६५ हून अधिक रोपांची लागवड केली आहे.
हे अभियानात रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, रो. किशोरजी निकते, रो. सचिन भिंगे, रो. संजय कपडेकर रो. श्रीरंग बागल तसेच सिंहगड कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी व कोर्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments