सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी बैठकसोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी बैठक


सोलापूर, (जिमाका) : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८(१)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी (दि.28 जुलै) रोजी नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


नियम १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियासांठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरीता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


 


जिल्हा परिषद सोलापूरची सभा दि. 28 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजता नियोजन भवन सोलापूर येथे होईल. आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 हा असेल तसेच 29 जुलै 22 ते 2 ऑगस्ट 22 पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना सादर करता येतील.


 तसेच पंचायत समिती करमाळा (पंचायत समिती सभागृह करमाळा), पंचायत समिती माढा (माढा नगरपंचायत माढा ), पंचायत समिती बार्शी (पंचायत समिती सभागृह बार्शी), पंचायत समिती उत्तर सोलापूर (नूतन मराठी विद्यालय डफरीन चौक सोलापूर) , पंचायत समिती मोहोळ (पंचायत समिती सभागृह मोहोळ), पंचायत समिती पंढरपूर (शेतकी भवन, पंचायत समिती कार्यालय मागे कराड रोड पंढरपूर), पंचायत समिती माळशिरस (पंचायत समिती सभागृह माळशिरस), पंचायत समिती सांगोला (पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला), पंचायत समिती मंगळवेढा (तहसिल कार्यालय मंगळवेढा), पंचायत समिती दक्षिण सोलापुर (श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर), पंचायम समिती अक्कलकोट ( पंचायत समिती सभागृह अक्कलकोट) या सर्व पंचायत समितीच्या सभा दिनांक 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता वरील दिलेल्या ठिकाणी होतील. या सर्व पंचायत समितींचा आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 आहे. तसेच 29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना सादर करता येतील.


जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाश्यांना सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी वेळेत हजर राहावे, असे आवाहन श्री.उदमले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments