स्वेरीत दि. २६ जुलै रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजनस्वेरीत दि. २६ जुलै रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

शिक्षण क्षेत्रातील तज्ञ करणार मार्गदर्शन

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये येत्या मंगळवार, दि. २६ जुलै २०२२ रोजी राज्यातील शिक्षणतज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र येत असून ते ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ म्हणजे काय व त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, जेणे करून उच्च शिक्षणातील उत्कृष्ठता साध्य करता येऊ शकेल.’ या विषयी बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत. या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटे हे लाभले आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. 

          स्वेरी इंजिनिआरिंगच्या भव्य आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये ‘अंडरस्टँडिंग अँड इफेक्टीवली अप्लायींग नॅशनल एज्युकेशन पॉलीसी २०२० फॉर अटेंनिंग एक्सलन्स इन हायर एज्युकेशन (उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे)’ या विषयावर आयोजिलेल्या या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटे यांच्या बरोबरच भाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ व रसायनशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा. बी. एन.जगताप हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत तर शिक्षणतज्ञ प्रा. आनंद मापुसकर हे विशेष अतिथी म्हणून लाभले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे असणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर शिक्षण तज्ञ पाहुणे व प्राध्यापक वर्ग यांच्यात पॅनल डिस्कशन होणार आहे. या कार्यशाळेसाठी सोलापूर जिल्ह्यातील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, डी.एड, बी.एड, आदी कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य व प्राध्यापक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींवर प्रकाश पडणार आहे आणि भविष्यात या विचारमंथनाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या एकदिवसीय कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा. करण पाटील (मो.क्र- ९५९५९२११५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments