*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन सन्मानपत्र*

पंढरपूर: प्रमोदराजे बनसोडे 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आषाढी वारी मध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर तसेच माहिती व मदत पोलीस प्रशासन सोलापूर विभाग यांच्या सोबत वारक-यांच्या सेवेसाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खुप महत्वपूर्ण मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले.   सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

  यादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रशांत कुचेकर, उमेश भुसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख सर, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ आदीसह विद्यार्थी संखेने उपस्थित होते.

      यादरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून सिंहगड कॉलेज चे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. याशिवाय वारी मध्ये सेवा करत असताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी यादरम्यान मनोगत व्यक्त करताना सागितले.

    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्रकुमार नायकुडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments