नाना पटोलेंचा रोमान्स " इन चेरापुंजी " चित्रा वाघ म्हणाल्या एकदम ओके कार्यक्रम

Pandharpur Live Online : Viral Video shared by BJP leader Chitra Wagh: महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापल्यानंतर सत्तांतर सुद्धा झालं. त्याच दरम्यान आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

हा व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवालही विचारला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नाना पटोले (Nana Patole) असल्याचा दावा करणअयात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरंच नाना पटोले यांचा आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. (BJP Chitra Wagh tweeted video of congress leader with a caption of kay nana tumhi pan jhadi kay dongar kay hotel)

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं...." असं म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस यांना ट्विट केलं आहे.


व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती हॉटेलमध्ये एका महिलेच्या गळ्यात हात टाकून बसलेला आहे. हा व्हिडिओ पाठीमागून शूट करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा दिसू शकत नाहीये. पण व्हिडिओत नाना पटोले यांनी त्याच रंगाचा टी शर्ट परिधान केल्याचे फोटोजही दाखवण्यात आले असून तो त्यांचा व्हिडिओच असल्याचं म्हटलं जात आहे.



चित्रा वाघ यांनी काय म्हटलं?

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, माझ्याकडे तो व्हिडिओ आला. मला सुद्धा तो व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं. मी सुद्धा तो चेक केलं, बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यावर मी सुद्धा नानांनाच विचारलं की नेमका प्रकार काय आहे? पण अद्याप त्यांच्याकडून तरी काही प्रतिसाद आलेला नाहीये.


काय म्हणाले नाना पटोले?

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, राजकारणातील पातळी खालावत आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल त्या बद्दलची प्रक्रिया सुरू आहे. आमचं लेगल सेल याबाबत कारवाई करेल. आम्हाला बदनाम केलं जात आहे. हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टाइम्स नाऊ मराठीने या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाहीये. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे त्याचं आम्ही केवळ वृत्तांकन करत आहोत.

Post a Comment

1 Comments

  1. चित्रा वाघ ने आता प्रयन्त त्या बेडरूम मधील निर्मला यादव आणि अत्याचार करनारा श्रीकांत देशमुख याचा बद्दल एक शब्द बोलली नाही आता तथाकथित वीडियो वर पत्रकार परिषद घेत आहे या ला म्हणतात आपला ठेवायचा झाकुन अन दुसर्याचा बघायचा वाकुन्

    ReplyDelete