मतदार संघ पुनर्बांधणीची समाधान आवताडे यांना संधी


 मंगळवेढा ः  श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासदांनी अभूतपूर्व सत्तांतर घडवून आ. समाधान आवताडे यांना कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पराभूत केले.

पण, या पराभवाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर बघितले तर विधानसभेच्या पुनर्बांधणीसाठी विद्यमान आ. समाधान आवताडे यांना मोठी संधी असल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन आ. स्व. भारत भालके यांच्याकडून गेल्या निवडणुकीत सभासदांनी कारखाना समाधान आवताडे यांच्याकडे दिला. त्या निवडणुकीत भालके यांच्या पेक्षा त्यांच्याकडून कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करणार्‍या उमेदवारांवरील असणारा राग हा विधानसभेसाठी थेट भालके यांना अडथळा ठरणारा होता. सत्तांतर झाल्यानंतर भालके यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढून थेट जनतेशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. प्रत्येक गावाने समस्या कोणतेही राजकारण न आणता. सोडवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

आता तीच संधी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडे आले असून, कारखान्याची यंत्रणा निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरता येते. हा दृष्टिकोन कालबाह्य ठरला असल्याचे आपल्याला 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले असून विधानसभा निवडणुकीमध्ये सुधाकरपंत परिचारक, समाधान आवताडे या दोन दिग्गजांना मंगळवेढ्यात कोणत्याही संस्था कोणतीही यंत्रणा हाताशी नसताना भालके यांनी चितपट केले होते.वास्तविक समाधान आवताडे यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने संत दामाजी साखर कारखान्याची सूत्रे सभासदांनी दिली होती. मोठे उद्योजक आहेत. साखर कारखानदारी मधील त्रुटी समजून घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने साखर कारखाना चालवून तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांना व कर्मचार्‍यांना याचा फायदा होईल. हा उदात्त हेतू सभासदांनी परिवर्तन करताना ठेवला होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे समाधान आवताडे यांना सभासदांना अपेक्षित असणारा कारभार करता आला नाही. यातच त्यांच्याकडून सभासदांना अपात्र ठरवण्याच्या नोटिसीचा मुद्दा कळीचा ठरला.


संस्थांच्या निवडणुका व सार्वत्रिक निवडणुका यामध्ये मोठा फरक असो सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे येणार्‍या काळातील नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आदि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारसंघातील आमदार म्हणून प्रत्येक गावनिहाय प्रलंबित समस्या खोळंबलेली कामे याकडे लक्ष देऊन थेट जनतेचा संबंध येणार्‍या व्यवस्थेमध्ये आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील सत्तेत असलेल्या गोष्टीचा फायदा घेतला. तर येणार्‍या काळात मतदारसंघात चांगली बांधणी त्यांच्याकडून होऊ शकते.

कारखान्यातील परिवर्तनानंतर आता त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही राहिले नसून आगामी काळातील निवडणुकांकडे त्यांच्याकडे मतदारातील रोष शिल्लक राहिला नाही. मंगळवेढा शहरातील नगरपालिकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील गटांची पुनर्रचना झाल्यानंतर अनेक समीकरणे बदलले असून, समाधान आवताडे यांच्याकडे त्याच ठराविक चेहर्‍याशिवाय नवीन माणसांचा शोध घेऊन त्यांना ताकद देणे राजकीय दृष्ट्या गरजेचे झाले असून, दीर्घकाळ मंगळवेढा तालुक्यात राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विभागाला प्रत्येक भागातील कार्यकर्त्याला विविध ठिकाणी संधी देणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments