याला म्हणतात नशिब! सकाळी भाजी घेण्यासाठी ५०० चे सुट्टे घ्यायला गेला अन् करोडपती बनलाPandharpur Live Online :

 Trending man buy lottery ticket won prize : 500 ची नोटा सुट्टे करण्यासाठी फक्त लॉटरीचे तिकीट घेतले. या लॉटरीच्या तिकिटामुळे या व्यक्तीची चांदी झाली.

काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं की त्यांच्या कहाण्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अशीच एक घटना केरळमधून समोर येत आहे. ही व्यक्ती भाजी घेण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. पण त्यात भाजीपाला घेण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते. 500 ची नोटा सुट्टे करण्यासाठी फक्त लॉटरीचे तिकीट घेतले. या लॉटरीच्या तिकिटामुळे या व्यक्तीची चांदी झाली. तुम्हालाही हे जाणून धक्का बसेल की काही तासांनंतर त्या व्यक्तीला जॅकपॉट (Jackpot) मिळाल्याची बातमी मिळाली. (Trending man buy lottery ticket for change of 500 rupees and won prize of crore viral lucky man interesting)


रातोरात करोडपती बनलेल्या व्यक्तीचे वय ७७ आहे. एखाद्या व्यक्तीने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सदानंदने लॉटरीमध्ये अनेकदा हात आजमावला, पण या वेळी नशिबाने साथ दिली नाही. बरेच लोक सदानंदला भाग्यवान म्हणत आहेत.

रिपोर्टनुसार, इन्कम टॅक्स कापल्यानंतर सदानंदला सुमारे 7 कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे. सदानंद सांगतात की, ''500 रुपयांची नोट सकाळी सुट्टे करण्यासाठी  त्यांची धडपड सुरू होती. पण, कुठूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी लॉटरी घेण्याचा निर्णय घेतला. लॉटरी खरेदीचा परिणाम असा झाला की त्यांनी जॅकपॉटमध्ये कोटींचे बक्षीस जिंकले.''

११ कोटीचा मालक बनला

लॉटरी विकत घेतल्यानंतर काही तासांनंतर सदानंद यांना समजले की त्यांनी 12 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. सदानंदची कहाणी ऐकून अनेकांना त्याचा हेवा वाटू लागला आहे. सदानंद यांना आता स्वतःच्या नशिबावर विश्वास बसत नाहीये. त्याच्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.

Post a Comment

0 Comments