स्वातंत्र्यदिन विशेष : सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याची कलाकृती झळकली भारत सरकारच्या पोर्टलवर ; सोलापुरात चित्रीकरण झालेल्या 'नवभारत' या शॉर्टफिल्म ला मिळाले विविध पुरस्कार!

Pandharpur Live : पोलीस अधीक्षक कार्याय सोलापूर ग्रामीण कार्यरत असलेले श्री.अभिजित प्रल्हाद अधटराव  लिखित व दिग्दर्शित " नवभारत ..एक चळवळ " हा लघुपटा ची निर्मिती केली असून हा लघुपट भारत सरकारच्या आझादी का अमृतमहोत्सव या पोर्टल वर स्वीकारून प्रदर्शित झाला आहे.

 आजकालचे लहान मुले व मोबाईल मुळे त्यांच्या वागण्यात होणारा बदल,  पालक व समाजाचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, राष्ट्रप्रेम, पर्यावरण संतुलन व सामाजिक बांधिलकी इ. वर भाष्य करणारा हा लघुपट असून प्रदर्शित होताच लोकांचा उदंड प्रतिसाद व पसंती मिळाली आहे


.  https://youtu.be/3ZC2kyQGLu0

 'नवभारत' या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण सोलापूर मध्ये झाले आहे. या लघुपटाच्या निर्मात्या सौ. मंजुळा अभिजित अधटराव असून लेखक व दिग्दर्शन अभिजित अधटराव, छायांकन नदीम शेख, संकलन सौरभ कांबळे, सह-दिग्दर्शन निखिल काळे, सबटायटल प्रा. नागेश खराडे, व्हॉईस ओव्हर - अथर्व लावणीस याचा असून मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओ सोलापूर येथे झाले आहे.

या लघुपटात अभिजित अधटराव, देव अधटराव, ओम भोसले, ओंकार जिंदे, नदीम शेख, निखिल काळे, संतोष भोसले, मंजुळा अधटराव, शाम खंडेलवाल, बाळासाहेब गवळी या कलाकारांनी काम केले आहे.

     सरकारी नोकरी सांभाळत एक सामाजिक बांधिलकी व अंगी असलेली कला व छंद च्या माध्यमातून यापूर्वी " बंदपाकिट " हा लघुपट देखील बनविला असून या लघुपटास अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

   भविष्यात देखील पोलीस विभागात आवड असलेल्या पोलीस अधिकारी , अमलदारांना व सोलापूर मधील कलाकारांना घेऊन समाजा मध्ये जनजागृती व्हावी म्हणून वेगवेगळे विषयांवर लघुपटाची निर्मिती करणार असले बाबत मत व्यक्त करून Devbhakti Production या Youtube चॅनल वर बंदपाकिट व नवभारत... एक चळवळ हे लघुपट सर्वानी अवश्य पाहून जास्तीत जास्त Share करून जनजागृती करावी व भविष्यात चांगले लघुपट पाहण्यासाठी Devbhakti Production या Youtube चॅनल ला Subscribe करण्याचे आव्हान श्री. अभिजित अधटराव यांनी केले आहे.  

श्रीमती. तेजस्वी सातपुते मॅडम, (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) यांनी नवभारत एक चळवळ या लघुपटास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments