अभाविप व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्नअभाविप व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'विकासार्थ विद्यार्थी' या उपक्रमांतर्गत स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न  झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना त्यांच्यात पर्यावरण विषयक आस्था निर्माण करून 'आपणही पर्यावरणाचा एक मित्र बनले पाहिजे' हा विचार रुजविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

     ‘वृक्षमित्र’ ही संकल्पना राबवित असताना प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षांशी मैत्री करून त्या वृक्षाची पूर्णपणे वाढ होईपर्यंत त्याची जपणूक करणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.   

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'विकासार्थ विद्यार्थी' या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 'विकसनशील' देशाकडून 'विकसित' देशाकडे मार्गक्रमण करत असताना ‘पर्यावरण’ हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी व परिसरात १००१ वृक्षारोपणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापैकी आज गोपाळपूर-रांझणी रोडच्या दुतर्फा १०१ झाडांचे पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, चिंच, करंज, वड अशी विविध प्रकारची झाडे असून भविष्याच्या दृष्टीने ही झाडे अतिशय उपयुक्त आहेत. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'विकासार्थ विद्यार्थी' या उवक्रमाचे  राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी, अभाविप प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर, जिल्हा संयोजक पार्थ तेरकर, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, ग्रीन टीम चे सल्लागार व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती व डॉ. सुभाष जाधव, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा.अविनाश सपकाळ व जिल्हा सहसंयोजक शिवानी बेणारे, महाविद्यालय प्रतिनिधी प्रशांत मदकंटे, सचिन पारवे, गुरू राऊत, धनराज भोसले आदी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments