*पंढरपूर सिंहगडच्या सुप्रिया घोरपडेची तीन कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड* शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे असते. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे.                    
   कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेतलेल्या करमाळा तालुक्यातील कुमारी सुप्रिया संजय घोरपडे हिची कॅम्पस मुलाखतीतून विविध तीन नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
    सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन कुमारी सुप्रिया घोरपडे हिची "एफआयएस ग्लोबल, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टीम काॅम्प्युटर प्रा. लिमिटेड आदी ३ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असून या निवडीबद्दल कुमारी सुप्रिया घोरपडे हिचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
     पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्लेसमेंटसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टीचे ज्ञान अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून प्रशिक्षणातून देण्यात येत असते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी खुप मोठा फायदा होत आहे.  सुप्रिया घोरपडे हिची  कॅम्पस मुलाखतीतून "एफआयएस ग्लोबल कंपनीकडून वार्षिक पगार (४.४१ लाख), एचसीएल टेक्नॉलॉजीज वार्षिक पगार
(२.७५ लाख) आणि टीम काॅम्प्युटर प्रा. लिमिटेड वार्षिक पगार (३.७८ लाख) मिळणार आहे. यापैकी सुप्रिया घोरपडे ही "एफआयएस ग्लोबल" कंपनीत रुजू होणार असल्याचे तिने सांगितले. 
  ह्या कंपन्या आयटी, कारपोरेशन क्षेत्रात कार्यरत असुन अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिक्षण घेतलेल्या व घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत असल्याने पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
     विविध कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments