कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे स्व . श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमीत्त आयोजीत विविध आंतरशालेय स्पर्धांची बक्षिस वितरणाने सांगता

 


पंढरपूर आज गुरुवार , दि .१८.०८.२०२२ रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे स्व . श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमीत्त आयोजीत विविध आंतरशालेय स्पर्धाची विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करुन सांगता झाली . मंगळवार , दिनांक १६.०८.२०२२ ते १८.०८.२०२२ रोजी पर्यंत प्रशालेच्या प्राचार्या सौ . प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून या ' कर्मयोगी स्मृती महोत्सवाला सुरुवात झाली . आदरणीय स्व . सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा चालविण्याकरीता कर्मयोगी ही संस्था सतत कार्य करत आहे . त्यातीलच एक भाग म्हणून स्व . कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमीत्त तीन दिवसीय कर्मयोगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यात पंढरपूरातील एकूण १६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला होता . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री प्रविदत्त वांगीकर उपस्थित राहिले . त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे • मार्गदर्शन करताना म्हणाले की , विद्यार्थी सकारात्मक दृष्टीकोनातून शिक्षण घेत राहीला तर पालक आणि विद्यार्थी यांची नेहमीच योग्य ती वाटचाल चालू राहील असा विश्वास प्रमुख पाहुण्यांनी दाखविला . श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर या परीवारातील सौ.सिमाताई प्रशांतराव परिचारक या कार्यक्रमाकरीता उपस्थित होत्या . आज या स्पर्धांचा रिझल्ट विजेत्यांना बक्षिसरूपे ट्रोफी व प्रमाणपत्र डॉ . श्री प्रविदत्त वांगीकर व सौ . सिमाताई परिचारक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले . बक्षिस समारंभा प्रसंगी अनेक शाळांतील विद्यार्थी शिक्षक - पालक यांनी आपली उत्स्फुर्त उपस्थिती दर्शविली . विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत . इ .५ वी ते ७ वी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम लेंगरे सार्थक , द्वितीय- तांदळे ऋषीकेश , तृतीय - राजरिया साळुंखे , श्लोक पठन प्रथम स्वाती बेलापूरकर , द्वितीय - रत्ननाभ नामदास , तृतीय प्रज्ञा • ठाकरे / शताक्षी परिचारक रांगोळी प्रथम सई चव्हाण , द्वितीय ख्याती कामत , तृतीय - ईश्वरी पवार चित्रकला प्रथम - अथर्व वाडेकर , द्वितीय प्रथमेश कुलकर्णी , तृतीय - भारती शिंदे स्कीट - प्रथम - कर्मयोगी विद्यानिकेतन , द्वितीय कर्मयोगी विद्यानिकेतन , तृतीय कर्मयोगी विद्यानिकेतन काव्यवाचन प्रथम कर्मयोगी विद्यानिकेतन द्वितीय कर्मयोगी विद्यानिकेतन , तृतीय कर्मयोगी विद्यानिकेतन राधिका देशपांडे तृतीय स्वरा कथाकथन ग्रथम सर्वजित नागटीळक , द्वितीय मांडवे / श्रुती कांबळे एकपात्री नाटक प्रथम सौजन्य क्षीरसागर द्वितीय श्रावणी काटे , तृतीय धारना दोशी प्रश्नमंजुषा प्रथम कर्मयोगी पब्लिक स्कूल , द्वितीय कर्मयोगी विद्यानिकेतन , तृतीय अरिहंत पब्लिक स्कूल निबंधलेखन प्रथम संस्कृती कुरे द्वितीय सृजन शिरोळकर तृतीय- गौरी पवार इ .८ वी ते १० वी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम - कैवल्य बडवे , द्वितीय पायाल चव्हान , तृतीय अस्मिता भोसले / अद्वैत देशपांडे C लोक पठन ग्रथम ध्रुव उत्पात , द्वितीय - धृती उत्पात / जया आठवले , तृतीय - समृद्धी ताठे / नंदिनी पवार रांगोळी प्रथम -नंदिनी घालके , द्वितीय श्रेहा कापसे , तृतीय - पद्मजा पाटील चित्रकला प्रथम भक्ती पवार , द्वितीय वैष्णवी लेंगरे , तृतीय - आदित्य जोशी स्कीट - प्रथम - कर्मयोगी विद्यानिकेतन द्वितीय आपटे उपलप प्रशाला , तृतीय कर्मयोगी विद्यानिकेतन काव्यवाचन प्रथम संविधान नागटीळक , द्वितीय- ईश्वरी घुले , तृतीय पायल चव्हाण / कार्तिकी बनसोडे कथाकथन ग्रथम - संविधान नागटीळक , द्वितीय - पायल चव्हाण , तृतीय- केतकी जोशी एकपात्री नाटक- उत्तेजनार्थ- वैष्णवी उकरंडे प्रश्नमंजुषा ग्रथम – कर्मयोगी विद्यानिकेतन , द्वितीय कवठेकर प्रशाला , तृतीय कर्मयोगी पब्लिक स्कूल निबंधलेखन प्रथम संध्या लेंढवे द्वितीय शर्वरी कोकणे , तृतीय सार्थक गुरव पंढरपुरातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करुन दिला तर विद्यार्थी जगाच्या कोणत्याही स्थरावर आपली छाप पाडतील असा विश्वास संस्थेचे चिफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक यांनी व्यक्त केला . आपला विद्यार्थी हा सर्वच क्षेत्रात चमकणारा आणि भविष्यात माहिती व तंत्रज्ञानाला योग्य प्रकारे हाताळणारा आहे असे मत प्राचार्या सौ . प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी मांडले . यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके , कर्मयोगी फाऊंडेशनच्या प्राचार्या , सौ . मानसी दास आदी मान्यवर उपस्थित होते . या समारंभाचे सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक गिरीश खिस्ते तर आभारप्रदर्शन व कार्यक्रमाची सांगता विजयालक्ष्मी शिवशरण यांनी केली . या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून शिक्षक समाधान पाटील , अजय नवले यांनी आपल्या कॅमे - यामध्ये या कार्यक्रमांचे सवर्णश्रण मिले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments