पंढरपूर सिंहगडच्या शुभम जाधवची "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" कंपनीत निवड*

 


*पंढरपूर सिंहगडच्या शुभम जाधवची "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" कंपनीत निवड*

"थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" हि कंपनी साखर कारखाना आणि मशिनरी क्षेञात कार्यरत आहे. याशिवाय सिमेंट प्लांट आणि मशिनरी मध्ये कार्यरत असणारी "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" कंपनी हि भारत, दक्षिण पुर्व आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील ग्राहकांना सेवा देत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील जैनवाडी (ता. माढा) येथील शुभम तुलसीदास जाधव यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती काॅलेजचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

  अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अथवा शिक्षण घेत असतानाच अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना निराशा पदरी पडते. नामांकित कंपनीदेखील गुणवत्तपूर्ण विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाते. अशावेळी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहूनच अनेक कंपन्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला भेट देत आहेत. सिंहगडचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कंपनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक लाभदायी ठरत आहे. त्यामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध नामवंत व नामांकित कंपन्यांमध्ये निवडले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध करून आपले करिअर करीत आहेत.

   "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" कंपनीत निवड झालेल्या शुभम जाधव यांना कंपनीकडून ३.२५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अभिजित सवासे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments