कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेस “जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार-२०२१-२२” प्रदान


पंढरपूर – पंतप्रधान श्री नरेंद मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेने स्वच्छता क्षेत्रातही आपला ठसा उमटवत शालेय शिक्षण क्षेत्रातील जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार आज दि.१८.०८.२०२२ रोजी सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.

       प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडून यावर्षी पासून जिल्ह्यातील सर्व विद्यालयांचे स्वच्छतांचे अहवाल मागवून सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये निरीक्षकांनी प्रत्येक शाळांची स्वच्छतेबद्दल इत्यंभूत पाहणी करुन व प्रत्यक्षात ऑनलाईन माहिती भरून त्यांचे गुणांकन केले व त्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रशालेला हा पुरस्कार देवून सोलापूर येथे  गौरवान्वित करण्याचे योजिले व त्यानुसार कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेने १०० पैकी ९६ गुण घेवून ओव्हरऑल फाईव्ह स्टार (पाच स्टार) रेटींग म्हणजेच अतिउत्तम श्रेणी मिळवल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रशालेच्या वतीने उपस्थित संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांना स्वच्छता प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी श्री.किरण लोहार (प्राथ.) हे देखील उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार(SVP) या पुरस्कार स्पर्धेत पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतागृहे या क्षेत्रात अनुकरणीय करणा-या शाळांना या पुरस्काराने मान्यता, प्रेरणा आणि पुरस्कार प्रदान केला जातो.

       प्रशालेने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे चीफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक यांनी प्रशालेच्या प्राचार्या, रजिस्ट्रार व सर्व शिक्षक कर्मचार्यांचे मोठे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments