पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये किरणजी वाटारे यांचे व्याख्यान संपन्न


पंढरपूर: प्रमोद बनसोडे

रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने "रसाहार, फलहार पासून सहज रोगमुक्ती" या विषयावर व्याख्याते किरणजी वाटारे यांचे व्याख्यान दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आले होते.

   या व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याख्याते किरणजी वाटारे यांचे स्वागत रोटरी अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, रो. सचिन भिंगे, रो. किशोर निकते, रो. श्रीरंग बागल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या दरम्यान बोलताना किरणजी वाटारे म्हणाले, माणसाच्या आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आहार व्यवस्थित असणे खुप आवश्यक आहे. आयुष्यातील सगळ्याच गोष्टी ज्ञानाने भेट नाहीत. देवावर श्रद्धा ठेवा. आध्यात्मिक क्षेञात अलिकडच्या काळात अंधश्रद्धा खुप मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. दैनंदिन जीवनात आहारात नियमितता असणे आवश्यक आहे. शरीराचा एखादा पार्ट खराब होण्यापूर्वीच शरीराकडे लक्ष द्या. शरीरातील अतिरिक्त आजार बाहेर येत असतील तर तुम्ही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे. शरीरातील आजार हा गोळ्या औषध घेऊन बरे होत नाहीत तर ते फक्त वेदना कमी करतात. यासाठी आजार होऊ नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर रसाहार व फलाहार अत्यंत आवश्यक आहे. आहारातून थकवा, ताकद मिळत असतात. वयाच्या २५ वर्षा नंतर आहार संतुलित ठेवा. आहार व्यवस्थित नसेल तर शरीरात अनेक आजार उद्भवतात. शरीरात प्राणशक्ती आहे तोपर्यंत शरीर चालणार. जर शरीरात थकवा जाणवत असेल तर पंधरा दिवसांसाठी आहार बदलणे आवश्यक आहे. मनाची तयारी करू आहार घ्या. हिम्युटीनी पाॅवर वाढविणे आवश्यक आहे. शरीराचा उपवास करत असताना फलाहार घ्या. सकाळचा आहार हा दुपारी १२ वाजता करा. आजार होऊ नये यासाठी कोणत्याही झाडांचा पानांचा रस घ्या. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर १५ दिवस सिजवलेले अन्न न घेता रसाहार व फलाहार घेतल्यास शरीर सुदृढ होईल असे मत किरणजी वाटारे यांनी सिंहगड कॉलेज मध्ये बोलताना मत व्यक्त केले आहे.

    या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments