पंढरपूर सिंहगड मध्ये " यशस्वी उद्योजक कसे व्हावे " याविषयावर व्याख्यान संपन्न*कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे  याविषयावर  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या वतीने  आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

       पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या साठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे याविषयावर  व्याख्यान  आयोजित करण्यात आले होते या व्याख्यान  सुरुवातीस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी श्री नंदकुमार दुपडे यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे  डॉ बाळासाहेब गंधारे  व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांनी  सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.   यावेळी बोलताना श्री नंदकुमार दूपडे म्हणाले नवीन उद्योजक व्यवसाय सुरू केल्या वर तो उद्योग कसा यशस्वी  होईल या बद्दल विनोदी शैली मध्ये मार्गदर्शन केले व आपल्या उदोग मध्ये आपण ग्राहक बरो बर कसा  सवाध कसा  साधला पाहिजे या बद्दल महत्त्व पूर्ण माहिती  दिली व नवीन उद्योजकांमध्ये जर पॅशन असेल तर तो उद्योजक यशस्वी होतोच अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांना साठी कम्प्युटर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपारमेंट इलेक्ट्रिकल डिपारमेंट या शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते

. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा.विक्रम भाकरे,प्रा.मनोज कोळी प्रा. स्वप्नील टाकळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले .

Post a Comment

0 Comments