पंढरपूर सिंहगडची थायलंड येथे आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद*

 


जगभरातील वेगळे संशोधक यांनी एकत्र येऊन "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निंग" याविषयावर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद थायलंड देशातील बॅककाॅक येथील द अँबेसेंटर हाॅटेल मध्ये दिनांक  २० व २१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती शोधनिबंध परिषदेचे संचालक डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

      या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे प्रास्ताविक करताना डाॅ. कैलाश करांडे म्हणाले, सद्या जीवनात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद घेणे आवश्यक आहे. याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निंग या विषयाचे इंडस्ट्रीज ४.० मध्ये होणारे परिणाम याविषयी डाॅ. कैलाश करांडे मनोगत व्यक्त केले.

     या शोधनिबंध परिषद मध्ये भारत, नाॅर्वे, मलेशिया, साऊथ कोरिया, थायलंड आदी देशातून १३२ हून अधिक प्रबंध प्राप्त झाले होते. यामधुन निवडलेले 36 प्रबंध सादर करण्यात आले. यामधुन वेगवेगळ्या विभागातून ६ ॲवार्ड  देण्यात आले.

 ही परिषद पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आणि पुणे येथील ग्लोबल रिसर्च काॅन्फर्स यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंड मध्ये उत्साहात संपन्न झाली.

    या परिषद मध्ये डाॅ. कैलाश करांडे, पुणे येथील  डाॅ. प्रकाश दिवाकरन, थायलंडच्या डाॅ. जुन बर्नाडेट डिसोझा, थायलंडचे डाॅ. सीबूधर्मराजन, डाॅ. सुलैमैय इथिओपिया, डाॅ. टोसापाॅर्न महामुद, डाॅ. सैद उमर, कॅनडाचे डाॅ. मनोज जैन आदींनी सेशन चेअर म्हणून काम पाहिले.

      हि शोधनिबंध परिषदेचे सुञसंचलन प्रा. नामदेव सावंत यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी मानले. ही शोधनिबंध परिषद यशस्वी करण्यासाठी  प्रा. सुमित इंगोले, प्रा. गणेश बिराजदार सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेफोटो ओळी: थायलंड येथील आयोजित आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मध्ये विविध देशांतील संशोधक

Post a Comment

0 Comments