अन्यथा नॅशनल हायवे चे अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासू:-वैभव जावळे*मोहोळ:-प्रतिनिधी 

सोलापूर ते मंगळवेढा हायवे वर सिद्धनाथ साखर कारखाना जवळ असलेला ब्रिज दोनशे फूट लांब चिरला आहे त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर मंगळवेढा हायवे होऊन फक्त सहा महिने झाले आहेत तरी इतक्या लवकर ब्रिज चिरणे म्हणजे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्यामुळे आठ दिवसात हे दुरुस्त करावे आणि त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करावी व दुरुस्त होईपर्यंत इचगाव येथील टोल बंद करावा

 अन्यथा5/9/2022 रोजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील जिल्हा संपर्कप्रमुख जमीर भाई शेख शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हायवे चे चिटणीस साहेब यांच्या अंगावर शाही टाकणार असल्याचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाकडून  नॅशनल हायवे चे अधिकारी चिटणीस साहेब व सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब  यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका प्रमुख वैभव सावळे कार्याध्यक्ष अनिल पाटील संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर युवक उपाध्यक्ष म्हमाने सावळाराम जावळे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments