*कर्मयोगी मध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न.*श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनियरींग) महाविद्यालयामध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शेळवे गाव चे तलाठी श्री बिटू कौलगे व भंडीशेगाव  गाव चे तलाठी श्री श्रीकांत कदम यांनी या संदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी प्रात्यक्षिक म्हणून उपस्थितांना वोटर हेल्पलाईन ॲप वरून एक मतदान ओळखपत्र आधार कार्ड ला  लिंक करून दाखविण्यात आले. भविष्यामध्ये मतदान ओळखपत्र व आधार लिंक असणे ही आवश्यक बाब होणार असलेमुळे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांनी या शिबिराच्या मार्गदर्शनातून  आपले मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  एस पी पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी या उपक्रमाचे महत्व विषद केले. 

प्रा. राहुल पांचाळ व प्रा. धनंजय शिवपुजे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री पांडुंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

सदरच्या शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार श्री जी डी वाळके, उपप्राचार्य श्री. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments