समृद्धी ट्रॅक्टरच्या लकी ड्रॉ ची सोडत*विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत आबा पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स एजन्सीच्या वतीने  विक्री करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांना खास गुडी पाडव्यासाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. याची सोडत मंगळवार दि २३ऑगष्ट रोजी एजन्सीच्या कार्यालयासमोर झाली. यामध्ये तीन भाग्यवंतांना  डबल फळी नागर गिफ्ट म्हणुन देण्यात आले. उर्वरीत ट्रॅक्टर खरेदी मालकांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. 


समृद्धी ट्रॅक्टर एजन्सीच्या वतीने सोनालिका कंपंनीचे ट्रॅकटर घेणाऱ्या मालकांना गुडीपाडवा सण निमित्ताने २३मार्च ते ४ एप्रिल २०२२या कालावधीत लकी ड्रॉ मध्ये समावेश करून आकर्षक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे समृद्धी एजन्सीच्या वतीने जाहीर केले होते. त्याप्रमाणे हा लकी ड्रॉ काढण्यात आला. या काढण्यात आलेल्या लकी  ड्रॉ मध्ये अंकुश लक्षमण केंगार रा. हुलजती ता मंगळवेढा, अर्जुन नारायण भुसणर रा डिकसळ ता सांगोला, अनिता बंडोपंत बनसोडे रा सलगर ता मंगळवेढा. यांना डबल फळी नगर भेट देण्यात आला. उर्वरीत मालकांना आकर्षक  भेट वस्तू देण्यात आल्या. 

       या लकी ड्रॉ चे वेळी धाराशिव शुगर चे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे व संदीप खारे,सोनालिका टॅक्ट्रर चे मॅनेजर सोमनाथ केसकर, फिल्ड ऑफिसर संतोष गर्कळ,  हणमंत पाटील, नंदकुमार बागल, कुलदीप कौलगे, डॉ राजेंद्र यादव, नवनाथ नाईकनवरे, गोपाळ पाटील, अण्णासाहेब साळुंखे यांच्यासह सोनालिका ट्रॅकटर कॅंम्पनी आणि समृद्धी टॅक्टर एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments