विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे- डाॅ. सुहास कुलकर्णी*

 


नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी छोटा मोठा व्यवसाय उभा करणे आवश्यक असते. प्रत्येकाला नोकरी भेटलच याची शाश्वती खुप कमी आहे. अलीकडच्या काळात सुशिक्षित बेकारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता असते. यासाठी विद्यार्थ्यांनी सद्या गरज लक्षात घेऊन पेटंट्स व काॅपी राईट ची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याची सध्याची गरज लक्षात घेऊन वाटचाल करणे अपेक्षित असते. स्टार्टअप चे महत्व व अभियांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्टार्टअप कडे जाण्याचा ओढा खुप आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या उपयोग स्वतःसाठी व जगासाठी करून उद्योग क्षेत्रात क्रांती करण्याचे आवाहन डाॅ. सुहास कुलकर्णी यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये ए. आय. सी. टी. ई. च्या अंतर्गत कपिला या विभागाच्या अंतर्गत "आय. पी. आर. अवेअरनेस प्रोग्रॅम" चे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. सुहास कुलकर्णी यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

    या व्याख्यानात महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.  

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments