पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आजची 'श्री' ची पुजा व आरती समाजसेवक विकास माने मित्र परिवाराच्या शुभहस्ते संपन्न

पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.


आजची 'श्री' ची पुजा पंढरीतील समाजसेवक विकास माने मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली. विकास माने, ओंकार जगताप, राजु राऊत, लिंगेश भुसनर, विजय कांबळे, सुनील बागवाले 
यांच्या शुभहस्ते पुजा व आरती संपन्न झाली.यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments