पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आजची 'श्री' ची पुजा व आरती स्वागत सुपर मार्केट चे संचालक रविंद्र राजपुत यांच्या शुभहस्ते संपन्न


पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.

आजची 'श्री' ची पुजा व आरती इसबावी, पंढरपूर येथील उद्योजक, स्वागत मॉल चे संचालक रविंद्र राजपुत यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी चि.अथर्व राजपुत उपस्थित होता.

यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री.राजपुत यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments