पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आजची 'श्री' ची पुजा व आरती यशश्री टेक्नोप्लास्ट चे संचालक अप्पासाहेब जाधव व ॲड.सौ.माधुरी अप्पासाहेब जाधव यांचे शुभहस्ते संपन्न

पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.

आज पंढरपूर लाईव्ह च्या नव्या स्टुडिओ तील श्रगणेशाची सायंकाळची पुजा व आरती पंढरीतील सुप्रसिद्ध उद्योजक, यशश्री टेक्नोप्लास्ट या युपीव्हीसी डोअर्स ॲन्ड विंडोजची निर्मिती करणाऱ्या नामांकित फर्मचे संचालक श्री.अप्पासाहेब जाधव व त्यांच्या सुविज्ञ पत्नी ॲड. सौ.माधुरी अप्पासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री. व सौ. जाधव यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले.






Post a Comment

0 Comments