कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे उद्घाटन.*


      

शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे येथे शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून  विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून  आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी केले. कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे येथे सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2022 च्या “सुविधा केंद्राचे” उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या बाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी महाविद्यालयातील सुविधा केंद्रातून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा. 

राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत बीई/बी टेक साठीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. यासाठी कर्मयोगी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मान्यता ही मिळाली आहे. 

यावेळी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात म्हणाले सर्वप्रथम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते यासाठीची मोफत सोय महाविद्यालयामध्ये केली आहे. महत्वाचे कागदपत्र जमा करणे व ते पडताळणे ही प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करावयाची आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन व कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया ही 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये पूर्ण करावायची आहे तर जमा केलेले कागदपत्र पडताळनीसाठी 4 ऑक्टोबर 2022 पर्यन्त चा कालावधी आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, स्कॉलरशिप व इबीसी सवलत यासंबंधीची संपूर्ण मार्गदशन केले जाणार आहे. तसेच कर्मयोगीने श्रध्येय श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतितून विद्यार्थी कल्याण योजना चालू केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना चार ही वर्षे शैक्षणिक फी मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. अधिकच्या माहितीसाठी साठी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात (9158325055) व प्रा. जे एल मुडेगावकर (9421090805) यांच्याशी संपर्क करुन विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करावी.


या सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. अभय उत्पात तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments