“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील विद्यार्थीनींची ‘तायक्वांदो’ राष्ट्रस्तरीय स्पर्धेत व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड”


श्री पांडूरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील इ. सातवीच्या विद्यार्थीनींची आटपाडी येथे दि. 16/9/2022 आणि 17/9/2022 रोजी संपन्न झालेल्या तायक्वांदो या राज्यस्तरीय स्पर्धेत मधुश्री प्रभाकर कांबळे हिने रौप्यपदक ‘सिल्व्हर’ मेडल मिळवले आहे व येत्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये होणा-या राष्ट्र्स्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी मधुश्रीची निवड झाली आहे. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील मुलींना तायक्वांदो सरावासाठी विशेष मार्गदर्शन केले जाते याचा फायदा आम्हाला झाला असे मत मधुश्रीने यावेळी व्यक्त केले.तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट संघामध्ये देखील कु.भक्ती पवार हिची निवड झाली आहे. यापुर्वी भक्तीने सलग २.३० तास क्रिकेट पीचवर आपली लढत ठेवण्याची विशेष कामगिरी केली होती. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील मुलींना क्रिकेट सरावासाठी विशेष मार्गदर्शन केले जाते याचा फायदा आम्हाला झाला असे मत भक्तीने यावेळी व्यक्त केले.प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी भक्ती आणि मधुश्री यांना पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा देत असेच यश इतर विद्यार्थ्यांनाही प्राप्त करण्याकरिता प्रशाले तर्फे आवाहन केले .

यावेळी श्रीपांडूरंग प्रतिष्ठानाचे चिफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक यांनी या दोन्ही विद्यार्थीनींचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments