सिंहगड मध्ये डेटा सायन्स संबंधित व्याख्यान संपन्न


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार  दि. 9 सप्टेंबर २०२२ रोजी  *डेटा सायन्स* या विषयासंबंधी विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात विभाग प्रमुख प्रोफेसर सुभाष पिंगळे यांनी प्रास्ताविक करताना सध्याच्या काळाची गरज म्हणून डेटा सायन्स तंत्रज्ञाना संबंधित माहिती दिली. नामांकित आय टी कंपनीमध्ये ( Synerzip)  सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर  म्हणून कार्यरत असणारे दिनेश झेंडे यांनी विद्यार्थ्यांना डेटा सायन्स संबंधित 

मार्गदर्शन दिले. त्यांनी या व्याख्यानामध्ये , डेटा सायन्स संबंधित बेसिक कन्सेप्ट, स्कोप ऑफ सायन्स,डेटा सायन्स क्षेत्रातील वेगवेगळ्या करिअर संधी संदर्भात, तसेच या फिल्डमध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर्स संबंधित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ .के .जे. करांडे बोलताना म्हणाले की,शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या वेबिनार व कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामधे नेहमीच केले जाते.    या व्याख्याना मध्ये १५० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.  उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दिनेश झेंडे यांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .या व्याख्यानाचे सूत्रसंचालन  विद्यार्थिनी वैष्णवी माळी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रोफेसर बाळकृष्ण जगदाळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments