राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन


                पंढरपूर (दि.20):- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.यावेळी मंदीर समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी आमदार अनिल बाबर , राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त ए. बी चासकर,  अधिक्षक नितीन धार्मिक, उप-  अधिक्षक आदित्य पवार,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच महेश साठे व मंदीर समितीचे कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments