पंढरपूर लाईव्ह च्या न्युज स्टुडिओतील अनंत चतुर्दशी रोजी 'श्री' ची सायंकाळची पुजा व आरती श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.


आज पंढरपूर लाईव्ह च्या नव्या स्टुडिओतील श्रीगणेशाची  अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळची पुजा व आरती श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. 


यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री.अभिजीत पाटील यांनी विघ्नहर्ता गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले. 

यावेळी नितीन सरडे, डॉ.दादासाहेब नागणे, आकाश घाडगे, नागनाथ पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments