आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश एमआयडीसीच्या जागेची पथकाकडून पाहणी*


पंढरपूर एमआयडीसीच्या जागेची पाहणी सोमवारी औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने केली. या पथकासमवेत, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत  परिचारक, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


गुरुवारी उद्योग मंत्रालयाच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी आमदार समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, मनसे नेते दिलीप धोत्रे उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या मुद्द्यास प्राधान्य दिले असून, त्याच दिवशी १९ सप्टेंबर रोजी एमआयडीसीच्या जागेची पाहणी करण्याचे धोरण ठरले होते. ठरल्याप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळाचे पथक पंढरपुरात सोमवारी दाखल झाले.


या पथकाचे स्वागत येथील शासकीय विश्रामगृहात, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी केले. 

शासकीय विश्रामगृह येथे एमआयडीसीचे पथक आमदार समाधान आवताडे, जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक प्रांताधिकारी गजानन गुरव व इतर प्रशासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. व बैठकीनंतर आलेले एमआयडीसी चे पथक  आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सर्व पदाधिकारी जागेची पाहणी करण्याकरता रवाना झाले. कोर्टी,  वाखरी, कासेगाव, रांझणी हद्दीतील जागेची पाहणी करण्यात आली. 


या पथकाच्या प्रमुख औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी बिरजे यांनी प्रत्येक ठिकाणच्या जागेची पाहणी करत बारकावे टिपले. पुढील काही दिवसात कोणती जागा योग्य आहे, याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि येथील प्रतिनिधी ठरवणार आहेत. यावेळी प्रांत अधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, वीज वितरण कंपनी चे भुतडा इत्यादी उपस्थित होते.

सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कळीचा मुद्दा ठरलेल्या पंढरपूर येथील एमआयडीसीचा प्रश्न खूप वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे.


यापूर्वी काही राजकीय नेते मंडळी  प्रयत्न केले होते त्याच्या पश्चात आमदार समाधानआअवताडे हे जिद्दीने व चिकाटीने काम करत असताना दिसत आहे. पंढरपूर एमआयडीसीसाठी जागेची निश्चिती झाल्यानंतर, त्वरित जागा खरेदी करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


सदर बैठकीसाठी व पाहणीसाठी याप्रसंगी पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मनसे नेते दिलीप  धोत्रे व इतर पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments