थकीत ऊसबिले वाटप केल्याबद्दल चेअरमन अभिजीत ( आबा ) पाटील यांचे अभिनंदन करण्याचा ठराव संमत

 


वेणुनगर , पंढरपूर दि . ११ : श्री विठ्ठल सह.सा.का.लि. , वेणूनगरचे मागील २ वर्षापासून थकीत असलेले ऊसबिलाची रक्कम रुपये ३० कोटी बुडतात की , काय असे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासदामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती . परंतु कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांचेवर विश्वास दाखवून बंद पडलेला साखर कारखाना श्री अभिजीत ( आबा ) शिवाय इतर कोणासही चालू होणार नाही , याची सभासदांनी मनात खात्री बाळगून श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल मधील सर्व उमेदवारांना निवडूण दिले

 या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांनी निवडणूकीच्या प्रत्येक सभेमध्ये मागील थकीत ऊसबिलाचे पेमेंट दिल्याशिवाय कारखान्याचे सन २०२२-२३ गळीत हंगामाची मोळी टाकणार नाही , असे अभिवचन दिले होते . 

 अधिक सुधारणा करुन सन २०२२-२३ च्या बॉयलर प्रदिपना पुर्वीच ऊसबिल देवून सभासदांचा दाहिदिशास विश्वास संपादन केला आहे . 

त्याबद्दल रविवार दिनांक ११.० ९ .२०२२ रोजीच्या मा . संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव पारित केला . त्यास कारखान्याचे संचालक श्री समाधान वसंतराव काळे यांनी सुचना मांडली व त्यास संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी अनुमोदन दिले .


 यावेळी कारखान्याचे सर्व संचालक , प्र . कार्यकारी संचालक , अधिकारी वर्ग , सभासद व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments