*पंढरपूर रोटरी क्लबच्या वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*


रोटरी क्लब पंढरपूर व करिअर काउन्सलींग ॲकॅडमी पंढरपूर आयोजित भारतातील व परदेशातील वैद्यकीय प्रवेशासाठी मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

    भारतातील व परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन पंढरपूर रोटरी क्लब व करिअर काउन्सलींग ॲकॅडमी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड काॅलेज सभागृहात सकाळी ११ ते २ या कालावधीत पंढरपूर येथील करिअर काउन्सलींग ॲकॅडमीचे अध्यक्ष डाॅ. किशोर बागडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये भारतातील व परदेशातील सर्व मेडिकल कॉलेज व त्यांच्या सर्व प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.   वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन चर्चासत्र शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रो. डाॅ. संगीता पाटील- ९५७९३२६४००, रो. डाॅ. बी. आर. पाटील- ९८९००५४३६४, रो. डाॅ. शशिकांत रणदिवे-९८९०८६८५५३ यांच्याशी संपर्क साधावा. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूर चे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे व रो. सचिव सचिन भिंगे सह रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments