सिंहगड मध्ये अ‍ॅडव्हान्स ट्रेंड्स इन आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषयावर व्याख्यान*

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथील स्थापत्य इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट सोमनाथ कराळे यांचे ऍडव्हान्स ट्रेंड्स इन आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्यात उत्साहात संपन्न झाले.

  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व ऍडव्हान्स ट्रेंड्स इन आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषायातील नवीन माहिती मिळण्यासाठी हे व्याख्यान आयोजित केले होते.

या व्याख्यानाची सुरुवात कार्यक्रमाचे वक्ते आर्किटेक्ट सोमनाथ कराळे, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. यशवंत पवार आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

   यादरम्यान आर्किटेक्ट सोमनाथ कराळे बोलताना म्हणाले, स्थापत्य अभियंता म्हणून कसे काम करावे, आपले स्वतःचे इमारत बांधण्याचे काम कसे पूर्ण करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून आलेल्या अडचणी व त्यावरील उपाय योजना कशी केली हे सांगितले. त्यांच्या अनुभवातून मुलांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळाले. त्यांनी पुढे बोलताना सुसज्ज इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती बद्दल पूर्ण माहिती दिली. मुलांच्या मनातील वेगवेगळ्या व्यवहारिक शंकांचे निवारण केले.

  हा कार्यक्रम सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टूडेंट्स असोसिएशन (सेसा) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. 

    या व्याख्यानात १५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी केले.

या व्याख्यानाचे नियोजन प्रा. अमोल कांबळे यांनी केले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सेसा विद्यार्थी प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments