आज बांधकाम क्षेत्रात स्टील ऐवजी बांबूचा वापर ही काळाची गरज- पाटलोबा पाटील*


स्टील ऐवजी बांबूचा वापर बांधकाम क्षेत्रात होणे ही आजच्या काळाची गरज आहे. उद्याचे आपण इंजिनिअर आहात व शेतकरी बांधवांनी ही काळाची पाऊले ओळखून बांबू पिकाची लागवड करणे गरजेचे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बांबू तज्ञ पाटलोबा पाटील यांनी पंढरपूर येथील सिंहगड कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू परिषदेमध्ये व्यक्त केले.


जागतिक बांबू दिनानिमित्त  सिंहगड कॉलेज पंढरपूर व चैतन्य गिरी बायोटेक इंडस्ट्रीज तसेच रोटरी क्लब पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले. या कार्यक्रात उपस्थित मान्यवरांचे सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

      या कार्यक्रमात बायोटेकचे संतोष दामोदरे यांनी बांबू चळवळीत शेतकरी व इंजिनिअर्स हे एकत्र येऊन खूप काही करू शकतात व त्यामुळे नवी दिशा मिळू शकेल व तसा या दोन घटकांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

     विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटलोबा पाटील यांनी बांबू लागवड आज किती महत्त्वाचे आहे यावर बोलताना सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हणून बांबू कडे पाहिले जाते. बांबू पासून साधारण पणे एक हजार ते दीड हजार विविध वस्तू बनवल्या जातात. याबरोबरच इथेनॉल बांधकाम क्षेत्रातही स्टील ऐवजी बांबू चा वापर होत आहे. याबरोबरच शेतकरी व विद्यार्थी यांनी बाजारपेठ बांबूच्या किती जाती त्याची लागवड कशी करावी, पाणी, खत, जमीन कशी असावी याबद्दलचे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पाटलोबा पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली.

 बांबू प्रणेते अभिषेक कांबळे यांनी बांबू लागवड किती किफायतशीर आहे व निसर्गाचा समतोल साधणारा आहे यावर सुंदर मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उमेश टोमके यांनी पर्यावरणाचा विचार करता नैसर्गिक वातावरणात वरचेवर बदल घडत आहेत कधी अवकाळी, ढगफुटी, तर कधी दुष्काळ पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशावेळी आपण आपल्या शेतीच्या क्षेत्रफळा पैकी एक एकर शेतात जर बांबू लागवड केली तर निसर्गाचा ही समतोल राखण्यास मदत होईल तसेच हवेमधील ऑक्सिजन वाढण्यास हातभार लागेल व नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या  नुकसानी मधून बाहेर पडण्यास मदतच होणार आहे. कारण बांबू या पिकावर नैसर्गिक आपत्तीचा कोणताही परिणाम होत नाही.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळात कृत्रिम ऑक्सिजन ने भरभरून येणाऱ्या रेल्वेच्या वॅगनच्या वॅगन मरणासन्न अवस्थेत असलेल्या  कोरोना पेशंटच्या मदतीसाठी सरकारतर्फे धावून आलेल्या आपण पाहिल्या आहेत परंतु बऱ्याच पेशंटचे प्राण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपण वाचवू शकलो नाही. पुढील काळात नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून जास्त काळ जीवन जगायचे असेल तर बांबू लागवड शिवाय पर्याय नाही याबरोबरच प्लास्टिकला पर्याय म्हणूनही सरकार सह विविध कंपन्या आज बांबूकडे पाहत आहेत.

मोठमोठे इंडस्ट्रीज मध्ये बॉयलर पेटवण्यास लाकडावर निर्बंध येत आहेत. अशावेळी बांबूच्या माध्यमातून पॅलेटची निर्मिती करून तो पर्याय इंडस्ट्रीजला योग्य ठरू शकतो.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोटरी क्लब पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे यांनी मानले.

या परिषदेत देविदास दामोदरे उद्योजक, अमोल पवार, मुलाणी सर, बिभीषण साळुंखे, सुनील खजे पवार, श्रीमंत मस्के (माजी सभापती) विनायक सादिगले सह कोर्टी, टाकळी, गादेगाव, सांगोला, महूद, येथील शेतकरी बांधव व विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments