पंढरपूर लाईव्ह च्या न्युज स्टुडिओतील अनंत चतुर्दशी रोजी 'श्री' ची दुपारची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न

 


पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.

आज पंढरपूर लाईव्ह च्या नव्या स्टुडिओतील श्रीगणेशाची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.


यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी सौ.साधनाताई भोसले यांनी विघ्नहर्ता गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी वृत्तनिवेदिका  सौ.निकीता साठे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी कु. श्वेता भोसले, डॉ.दादासाहेब नागणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments