जोशाबा टाईम्सचा १३वा वर्धापन दिन उत्सहात संपन्न

  


विवीध क्षेत्रातील मान्यवरांना "सद्भावना," "प्रेरणा" व "जीवन गौरव :पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.पंंढरपूर:-सा.जोशाबा टाईम्सचा  १३वा वर्धापन दिन रविवार दिं.२८आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता "विठ्ठल ईन सभागृह"येथे संपन्न झाला.

  कार्यक्रमाचे उद्घाटन अँड.रावसाहेब मोहन( राष्टीय अध्यक्ष, भारतीय लोकशाही राष्टवादी परिषद) यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.डी.पाराध्ये हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुश जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख,,रिपाईचे राज्यसंघटक सुनिल सर्वगोड,रिपाई प.म.उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब दोडके,कर्मवीर औदुंबर पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे,प्रा.सुरेखाताई नागटिळक भालेराव,(संपादक अखंड न्यूज़ पोर्टल प्राचार्य भाऊसाहेब कांबळे, (सरदार शामराव लिगाडे महाविद्यालय अकोला,)अंकुश शेंबडे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,पंंढरपूर) प्रा. धनंजय साठे(जिल्हाध्यक्ष, राष्टवादी सामाजिक न्याय विभाग) भालचंद्र कांबळे(जिल्हाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी,सोलापुर)डाँ. मंदार सोनवणे(अस्थीरोग तज्ञ) जितेंद्र बनसोडे प.म.अध्यक्ष रिपाई(ए)धनंजय आवारे(राजाध्यक्ष,रिपब्लिकन पिपल्स फ्रंट)संजय घोडके (शिवसेना तालुकाध्यक्ष) नानासाहेब वाघमारे(नेते     ए.एस.यु.एस  )   संजय अडगळे तालुकाध्यक्ष(ए.एस.यु.एस)आर.पी.कांबळे(अध्यक्ष, पंचशील तरुण मंडळ)संतोष  सर्वगोड(जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन कामगार आघाडी)रमेश कांबळे(माजी नगरसेवक ) सविता मोहळकर (माजी नगरसेवक,)संजय सावंत (मा.शहराध्यक्ष रिपाई  रवि सर्वगोड (जिल्हा सरचिटणीस बसपा) अमित अवघडे(शहराध्यक्ष डी.पी.आय) मुकंद घाडगे (तालुकाध्यक्ष डी.एस.एस.) अँड.अखिलेश वेळापुरे, ,प्रा.महादेव तळेकर हे उपस्थित होते

   या कार्यक्रमात विवीध क्षेत्रातील मान्यवरांना "सद्भावना," "प्रेरणा" व "जीवन गौरव :पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. बामसेफचे माजी राष्टीय अध्यक्ष,माजी जिल्हा हिवताप अधिकारी एल.एस.सोनकांबळे व जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समाजवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सुभाषराव सोनवणे यांचा "जीवन गौरव" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनिल वाघमारे(अनवली)व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष बापुसाहेब अवघडे(मंगळवेढा) यांचा "प्रेरणा पुरस्कार"देऊन गौरव करण्यात आला.

    तसेच विवीध क्षेत्रात  उल्लेखनीय कामगीरी करणारे जोशाबा टाईम्स परिवारातील पुढील सदस्यांचा "सद्भावना पुरस्कार" देऊन गौरव करण्यात येणार आहे.

   "कला"क्षेत्रातील पुरस्कार पंढरपुर येथील  गायक कलाकार रवि शेवडे, क्रिडा -आंतरराष्ट्रीय खेळाडूनी गौरविलेला  क्रिकेट पंच  दिपक नाईकनवरे(पंंढरपूर)साहित्य-लेखक, कवि,आत्मकथाकार पंडित कांबळे(उस्मानाबाद)

सामाजिक-इन्साफ,प्रबुद्ध परिवार, सम्राट अशोका सामाजिक संस्थेचे सक्रीय कार्यकर्तै श्रीधर जाधव(पुणे)

*प्रशासकीय-सामाजिक व बांधकाम विभाग प्रशासकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे अजयकुमार सर्वगोड रायगड,

*शैक्षणीक- विश्वासराव रणशिंग महाविद्याल कळंब वालचंदनगरचे उपप्राचार्य प्रा.अरुण कांबळे

*वैद्यकीय-नगरपरिषद पंंढरपूरचे वेद्यकिय अधिकारी व माजी आरोग्याधिकारी डाँ. बी.के.धोत्रे,(पंढरपुर)

*विधीज्ञ-नागवंश साहित्य संमेलन संयोजक अँड. संजय चंदनशिवे,

 *अभियंता-माजी ग्रामपंचायत सदस्य,कुशल बांधकाम तज्ञ आण्णासाहेब वायदंडे,(देगाव ता.पंंढरपूर)

*पत्रकारिता-व्यापारी संघाचे अध्यक्ष,दै.नवाकाळचे प्रतिनिधि व कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन सत्यविजय मोहोळकर(पंंढरपूर)

*उद्योजक-न.पा.शिक्षण मंडळाचे माजी व्हाईस चेअरमन, चुड्याचे लघु उद्योजक रामेश्वर सातपुते, (पंंढरपूर)

*कामगार-न.पा.पंंढरपूर येथील स्वच्छता कर्मचारी व जोशाबा टाईम्स ला सात्यत्याने सक्रिय मदत करणारे अनिल धोंडिराम कांबळे

आदी मान्यवरांचा समावेश होणार आहे.

या कार्यक्रमास लेखक,वाचक,हितचिंतक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक उपसंपादक विलास जगधने सर,यांनी केले तर सुत्रसंचलन दत्तात्रय कांबळे सर व प्रा.रवि रणदिवे यांनी केले तर आभार  संपादक श्रीकांत कसबे यांनी मानले .स्वागत निमंत्रक अंबादास वायदंडे यांनी केले.  तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय सोनबा वाघमारे यांनी करुन दिला.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शंकर वाघमारे, कृष्णा वाघमारे(माजी नगरसेवक) विठ्ठल वाघमारे,संदेश कांबळे, अजित खिलारे,लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण रणदिवे,राजेंद्र ढवळे,जीवन कांबळे, भारत कांबळे, आदीनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments