Varsha Usgaonkar : ' माफी मागा नाहीतर सडलेले ; मासे खाऊ घालू ' ; वर्षा उसगांवकरांना प्रमोशन पडलं महागात


मुंबई, 06 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर. अनेक वर्षांनी वर्षा उसगांवकर टेलिव्हिजनवर काम करत आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे वर्षा उसगावकर चर्चेत आहेतच पण आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका ऑनलाईन मासे विक्री करणाऱ्या कंपनीसाठी प्रमोशन केलं होतं. मात्र हे प्रमोशन वर्षाताईंच्या चांगलंच अंगलट आलं असून महिला कोळी मच्छी विक्रेत्यांनी संपात व्यक्त केला आहे. वर्षा उसगावकर यांनी आमची माफी मागा अन्यथा त्यांना सडलेले मासे खाऊ घालू असं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी म्हटलं आहे.काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. वर्षा उसगांवकर यांनी एका मासे विक्रेत्या कंपनीचं प्रमोशन केलं ज्यात त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी महिला विक्रेत्यांचा चांगलात संपात झाला असून उसगांवकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे.एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिने सृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

कायदेशीर नोटीस बजावणार त्याचप्रमाणे ज्या ऑनलाइन कंपनीने ही जाहीरात टाकली त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बाजवली जाईल त्याचप्रमाणे ही जाहीरात सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावी नाहीतर कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल, असं समितीचे उपाध्यक्ष ऍड. कमळाकर कांदेकर यांनी म्हटलं आहे. मच्छी विक्रेत्या महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इतकंच नाही तर उसगांवकारांनी जर मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी नाही मागितली तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन सडलेले मासे त्यांना खाऊ घालू असा निर्धार मुंबईतील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी घेतला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिली आहे.

अँपवाले कुठून मच्छी खरेदी करतात? जर कोळणीचे पती स्वतः मच्छीमार त्यांच्या स्वत:च्या मासेमारी नौका असताना त्या खराब मासळी का विकतील? ऑनलाइन ॲप वाले कोणत्या बोटीने मासेमारी करतात? ॲप वाले जर कोळणीच्या बोटीतून मासळी खरेदी करीत आहेत तर त्यांची मासळी ताजी कुठून येणार असा संतप्त सवाल कोळी महिलांकडून विचारण्यात आला आहे. कठोर पाऊल उचलण्याचा इशारा तसंच आपला व्यवसाय वाढवायचा आहे जरूर वाढवा पण आपल्या फायद्याकरीता मच्छीमारांना व कोळनी महिलांना बदनाम करून जर व्यवसाय करीत असाल तर हे खपवून घेतले जाणार नाही. या जाहिरातीचा संपूर्ण राज्यात निषेध केला जात असून जाहिरातीवर शासनाने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा मच्छीमार स्वतः आपली पावले उचलतील.

Post a Comment

0 Comments