○ पंढरपूर सिंहगडकाॅलेज मध्ये "अभियंता दिवस" उत्साहात साजराअभियंता बोलत नसल्याने कामाचे श्रेय इतर घेतात. अभियंताने बोलणे आवश्यक आहे. देशाच्या विकाची कामे अभियंत्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. एक अभियंता तयार होणेसाठी प्रचंड मेहनत असते. अभियंत्यांनी न खचता काम करणे आवश्यक आहे. अभियंत्यांनी बोलल्याशिवाय समाज सुधारणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्व नसल्याने विकास रखडला. महाराष्ट्र कडून सोलापूर वर अन्याय झाला आहे. विमान सेवा नसल्याने बिझनेस उपलब्ध होत नाहीत. अभियंत्यांनी अन्याय विरूध पेटून उठले पाहीजे. सिस्टमने अभियंत्यांवर अन्याय केला असल्याचे मत मिलिंद भोसले यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.


   कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न मौक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस "अभियंता दिवस" म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व मौक्षगुडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     या कार्यक्रमामध्ये स्टेट हेड टेक्निकल सर्विसेस महाराष्ट्र अँड गोवा स्टेट डालमिया सिमेंट भारत लिमिटेडचे विपिनकुमार कैला, चेअरमन सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे मिलिंद भोसले, सिव्हिल इंजिनिअर उदय उत्पात, इंजिनिअर शरदचंद्र कुलकर्णी, इब्राहीम शेख, इंजिनिअर सुहास खांबे, इंजिनिअर भालचंद्र केळकर, रोटरी क्लब पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे सह रोटरीचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते शाल, गुलाब फुल, वही, पेन देऊन स्वागत करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना डाॅ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, अभियंता दिवस आज सर्वञ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या प्रश्नांवर अभियंत्यांनी बोलणे आवश्यक आहे. शैक्षणिक धोरण बदल असले तरी भविष्यातील दृष्टीकोन डोळ्यासमोर अभियंत्यांची वाटचाल असणे आवश्यक आहे. भविष्यातील पिढी समोरील आव्हान पेलण्यासाठी इंजिनिअर हा महत्वपूर्ण घटक असल्याचे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले. 


     या कार्यक्रमात उदय उत्पात, भालचंद्र केळकर, मिलिंद भोसले सह अनेक मान्यवरांनी "मौक्षगुडम विश्वेश्वरय्या" यांच्याबद्दल तसेच अभियंता दिवसांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमास सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्रथमच "उत्कृष्ट विभाग" हा पुरस्कार हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाला देण्यात आला तर उत्तेजनार्थ प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाला देण्यात आला.   हा कार्यक्रम सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील राष्ट्रीय सेवा योजना, डालमिया सिमेंट, पंढरपूर रोटरी क्लब व सिंहगड कॉलेज रोटरॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments