*रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात संपन्न*

रोटरी क्लब पंढरपूर व करिअर काउन्सलींग ॲकॅडमी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या चर्चासत्राची सुरवात डाॅ. किशोर बागडे, डाॅ. कैलाश करांडे, सचिव रो. सचिन भिंगे, रो. डाॅ. संगीत पाटील आदीच्या हस्ते विद्येची आराध्य दैवत सरस्वतीचे पुजन करून दीपप्रज्वलनान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     रोटरी क्लब पंढरपूर यांचेकडून मार्गदर्शक डाॅ. किशोर बागडे व डाॅ. बी. आर. पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   या चर्चासत्रामध्ये डाॅ. किशोर बागडे यांनी मेडिकल कॉलेज मधील शैक्षणिक फी, मॅनेजमेंट फी, ऑनलाईन फाॅर्म भरताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात अनेक पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित राहिला होता.

    या चर्चासत्राचे सुञसंचलन डाॅ. संगीत पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोटरी क्लबचे सचिव सचिन भिंगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments