रोटरी क्लब कडून आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न*


रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सिंहगड कॉलेजच्या सभागृहात "आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर" आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

या आरोग्य शिबीराचे उद्घाटन सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान डाॅ. नामदेव गावडे, डाॅ. सुजय कुलकर्णी, डाॅ. प्रभाकर माळी, डाॅ. हर्षल एकतपुरे, डाॅ. अमित मेनकुदळे, डाॅ. खंडागळे यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डाॅ. कैलाश करांडे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक यांचा परिचय डाॅ. प्रभाकर माळी यांनी करून दिला.


    डाॅ. सुजय कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले, माणसाला अलिकडेच्या काळात पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. तीव्र स्वरूपाच्या पोटातील वेदनेंची अनेक कारणे  असतात. यामध्ये अँपिडिसाईटिस असु असतो. जठरातील आजार पण खुप जास्त पोटात दुखते. स्वादुपिंड दाह, स्वादुपिंड कर्करोग, आहार कसा असावा, मोठ्या आजारावर उपचार कशी करावी, पिताश्यातील खडे, लिव्हर सिरॅसिस, लठ्ठपणा, पचनसंस्था, जलोदर, यकृताच्या आजार, पचनसंस्था अशा विविध आजाराविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन डाॅ. सुजय कुलकर्णी यांनी केले.

    यावेळेस डाॅ. अमित मेनकुदळे यांनी त्वचारोग आजार व उपचार याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments