नागराज मंजुळे आकाश ठोसर सैराट नंतर पुन्हा एकत्र

 सैराटचा निर्मात दिग्दर्शक नागराज मंजुळेनं आपल्या एकाहून एक दर्जेदार सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. नुकत्याच आलेल्या झुंड सिनेमानं नागराज मंजुळे हे नाव हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध झालं.

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड सिनेमानं रेकॉर्ड तयार केले. मात्र सैराट आणि नागराज मंजुळे हे समीकरण कायमचं जोडलं गेले. सिनेमातील आर्ची आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोन चेहरे मराठी सिनेसृष्टीला मिळाले. सिनेमातील आकाश आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.झुंड नंतर नागराज मंजुळेनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. "घर, बंदूक, बिरयाणी" या सिनेमाचा टीझर समोर आला आहे. घर बंदूक बिरयाणी या सिनेमाचा पहिला टीझर मागच्या वर्षी 2021मध्ये रिलीज झाला होता. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओनी नव्या सिनेमाची घोषणा केली होती.गेल्या वर्षी सिनेमाचा छोटासा टीझर रिलीज केला होता. आता नवा टीझर समोर आला आहे ज्यात नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहेत. सिनेमाचा टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

दिवाळीच्या दोन दिवस आधी नागराज मंजुळेनं सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत 25 ऑक्टोबरला टीझर घेऊन येतोय असं म्हटलं होतं.आणि आज सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा सिनेमा केवळ मराठी नाही तर हिंदी आणखी दोन दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरमधून तशी घोषणा करण्यात आली आहे. सैराट नंतर पुन्हा एकदा नागराज आणि आकाश ठोसर एकत्र दिसणार आहे.

झुंडमध्येही आकाश ठोसरनं छोटी भूमिका साकारली होती. मात्र प्रत्यक्ष सैराटनंतर नागराज आणि आकाश दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. या दोघांच्या जोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयाचा तडकाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
सिनेमाच्या टीझरमध्ये नागराज मंजूळे आर्मी ऑफिसर ( भारतीय जवान)च्या भूमिकेत दिसत आहेत.


तर सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर दहशतवाद्यांच्या भूमिकेत आहेस असं म्हणावं लागेल. टीझरमध्ये कलाकारांच्या तोंडी एकही संवाद नाहीये पण सुरू असलेली चकमक प्रेक्षकांना धरून ठेवत आहेत. दरम्यान सयाजी शिंदे यांच्या कॉमेडिची छोटी झलकही पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर सिनेमाचं टायटल साँगही फारच कॅची आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीये. टीझर पासून सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे

Post a Comment

0 Comments