माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात पडली जान्हवी

 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये येते.


सोशल मीडियावर ती खुप सक्रिय असते. थोड्याच कालावधीत तिने बॉलिवुडमध्ये स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दिवाळीच्या पार्ट्यांमध्ये जान्हवीची हजेरीने सर्वांचे लक्ष वेधत आहे.

व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही ती खूप चर्चेत असते. अलीकडेच जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जान्हवी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसली आणि त्यामूळे चर्चांना उधान आलं आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जान्हवी कपूर तिचा चर्चेतील एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाच्या सूटमध्ये रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे.


यादरम्यान, ती तिथं उभ्या असलेल्या पापाराझींला पाहून हसते आणि कारमध्ये बसते, त्यात आधिच तिचा एक्स प्रियकर शिखर आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसत आहे.


 त्यांदोघांनी पापाराझींना फोटो देण टाळलं त्यामूळे या दोघांमध्ये पुन्हा अफेयर सुरु झाले का अशा चर्चा रंगल्या आहे. जान्हवीने याबाबत काही बोलण्याचे टाळले. अभिनेत्री शिखरसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा आहेत.

Post a Comment

0 Comments