धक्कादायक, डोळ्याला गंभीर इजा, हातावर जखमांचे व्रण , प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीला बेदम मारहाण

 पाकिस्तानच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे.

पत्नीने सोशल मीडियावर आपल्याला झालेल्या मारहाणीचे काही फोटो शेअर करत फिरोजचा खरा चेहरा लोकांसमोर आणला आहे. फिरोज तिला अत्यंत बेदम मारहाण करत असल्यातं तिने म्हटलं आहे. तसेच जवळपास चार वर्षांपासून सतत शारीरीक आणि मानसिक छळ होत असल्याचं देखील सांगितलं आहे. यानंतर आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.


फिरोज खान आणि पत्नी अलीजा यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर फिरोजने वेगळे घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण याच दरम्यानच फिरोज आणि अलीजा यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अलीजाने सोशल मीडियावर मारहाणीचे काही फोटो शेअर करत गंभीर आरोप केला आहे. या फोटोमध्ये अलीजाच्या शरीरावर जखमा दिसून येत आहेत.


अलीजाच्या हातावर जखमांचे व्रण दिसत असून तिचा डोळाही मारहाणीत सूजला होता. हे फोटो शेअर करत फिरोज खान आपल्याला मारहाण करायचा, असा आरोप अलीजाने केला आहे. फिराज खान पडद्यावर हिरो म्हणून वावरत असेल, तर पडद्यामागे तो हैवानासारखा वागत होता, असं अलीजाने म्हटलं आहे. ही बाब समोर आल्यानंतर फिरोजच्या चाहत्यांचाही त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.


काही वेळापूर्वी फिरोज खानच्या पत्नीने सोशल मीडियावर एक ओपन लेटर लिहून त्याची पोलखोल केली आहे. चार वर्षांच्या संसारत मला सतत मानसिक आणि शारिरिक त्रासाला तोंड द्यावं लागलं. अनेकदा फिरोजने माझा अपमान केला, ब्लॅकमेल केलं. मी संपूर्ण आयुष्य भीतीखाली घालवू शकत नाही. माझ्या मुलांचं आयुष्य, भविष्य चांगलं व्हावं, यासाठी मलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठीच मी वेगळं होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलीय असं पत्नीने म्हटलं आहे.


फिरोज खान हा पाकिस्तानाची प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तो निगेटिव्ह रोलसाठी जास्त लोकप्रिय आहे. पाकिस्तानच्या अनेक टॉप सीरियल्सध्ये त्याने आपल्या अभिनयाने लोकांचं मन जिंकलं आहे. इश्किया, दिल क्या करे, रोमियो वेड्स हीर, वोह एक पल या सारख्या काही कार्यक्रमांत फिरोज खान याने अभिनय केला आहे. मात्र आता फिरोजच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Post a Comment

0 Comments