आता हाच आमचा संसार , सोनाली कुलकर्णी यांनी दुबईत केली दिवाळी साजरी

 मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या सर्वत्र धामधूम सुरु आहे.


देशात असो किंवा देशाबाहेर असणारे भारतीय असो सर्वजण मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव साजरा करत आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णीसुद्धा मागे नाहीय. मात्र यंदाची दिवाळी सोनालीसाठी फारच वेगळी आणि खास आहे. त्याचं कारणही तसंच आहे.कारण यंदा सोनाली पहिल्यांदाच देशाबाहेर दिवाळी साजरी करत आहे. सोनाली यावर्षी आपला पती कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. आणि अगदी मराठमोळ्या पद्धतीने दुबईत दिवाळीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने झक्कास फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे.


सध्या देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घराची सजावट करण्यापासून, कपडे खरेदी करण्यापर्यंत आणि फराळ बनवण्यापासून रांगोळी काढण्यापर्यंत लोकांची सगळी लगबग दिसून येत होती. यामध्ये मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. कोरोना काळात सर्वच सणांवर निर्बंध आली होती.


परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच सण मोठ्या उत्सहात साजरे केले जात आहेत. दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण समजला जातो. या सणाची प्रत्येक व्यक्तीला मोठी आतुरता असते

Post a Comment

0 Comments