झीमराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.
कश्यप परुळेकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अनिता दाते आणि पल्लवी पाटील मारामारी करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर त्याने लिहिले की, झालं एखाद्या दिवशी एखाद्याचं सर्वात आधी पॅकअप... म्हणून ही अशी अडवणूक करायची
खरेतर या व्हिडीओत त्या दोघी खरोखर मारामारी करत नसून मस्ती करत आहेत. या व्हिडीओला फक्त चाहत्यांचीच नाही तर सेलिब्रेटींचीही पसंती मिळत आहे.
अभिनेत्री श्रुती मराठेला देखील वाटले की, त्या दोघी खरोखर भांडत आहेत. तिने कमेंटमध्ये लिहिले की, एक मिनिटं असं वाटलं की अनिता आणि पल्लवी भांडत आहेत. लगेच सेटवर यायला निघाले होते मी.
नवा गडी नवं राज्य मालिकेत चिंगी राघववर रागवून रमाच्या आई वडिलांकडे राहायला गेली होती. घर सोडून गेल्यानंतर चिंगीचा वाढदिवस असतो. ती घरात नाही त्यामुळे आधीच राघव चिंतेत असतो.
त्यात तिला घरी परत आणण्यासाठी आनंदी धडपडत असते. दरम्यान वाढदिवसाला वेश बदलून चिंगी घरात येते पण घरात सगळ्यांना समजते की ही चिंगी आहे. तिला आवडते म्हणून आनंदीने पाणीपुरी बनवली होती.
त्यावर चिंगी ताव मारते आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करते. त्यानंतर तिचा रुसवा निघून जातो आणि ती पुन्हा राघवकडे राहायला येते. दरम्यान घरात राघवची बहिण आणि आनंदीची बहिण माई यांच्यात वाद होतो आणि माई रागाने तिथून निघून जाते. आता आनंदी तिचा गैरसमज कशी दूर करेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
0 Comments