ठरल; समांथा प्रभू नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र , चाहत्यांना दिली गुड न्यूज

 

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य. दोघांच्या घटस्फोटानंतर दोघं सातत्यानं चर्चेत आहेत.


अभिनेत्री समांथला मायोसिटिस या आजार झाल्याची माहिती तिनं काही दिवसांआधीच दिली आहे. अभिनेत्री सध्या आजाराचा सामना करत असून तिच्या कामात खुश आहे. तर नागा चैतन्य देखील त्याच्या कामात बिझी आहे. दोघांच्या घटस्फोटानंतर दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्साही होती.
मात्र तो योग काही आला नाही. परंतू आता घटस्फोटानंतर पहिल्यांदा समांथा आणि नागा चैतन्य एकत्र दिसणार आहे. दोघांनी एकत्र एक प्रोजेक्ट साइन केला असून दोघे एकत्र काम करणार आहेत. समांथा सध्या मायोसिटिस आजाराचा सामना करतेय.

अशातच तिचा यशोदा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . ट्रिटमेंट सुरू असताना समांथा सिनेमाचं प्रमोशन देखील करताना दिसतेय. अभिनेत्रीनं डबिंग करता करता ट्रिटमेंट सुरू असताना एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिच्या हाताला सलाइन लावल्याचं दिसत आहे.


बॉलिवूड लाईफनं दिलेल्या माहितीनुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांनी एक प्रोजेक्ट साइन केला. ज्यात दोघे एकत्र काम करणार आहेत. नव्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती अद्याप समोर आली नसली तरी दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्साह दाखवला आहे. समांथा आणि नागा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
त्यामुळे दोघेही त्यांची पर्सनल भांडणं बाजूला ठेवून एकत्र काम करण्यासाठी तयार झाले आहेत. नागा चैतन्य आजही समांथाला त्याची चांगली मैत्रीण समजतो. याचा प्रत्येय नुकताच पाहायला मिळाली. समांथाच्या आजाराची माहिती मिळताच नागा चैतन्य आणि त्याचे वडिल अभिनेते नागार्जुन यांनी काळजी करत विचारपूस केली होती.नागा आणि समांथा यांनी 2017मध्ये लग्न केलं. एका सिनेमाच्य सेटवर दोघांची ओळख झाली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांनी अत्यंत आवडली. मात्र पुढच्या काळात दोघांच्या नात्यात दुरावा येत गेला.

असं म्हटलं जातं की, समांथाची प्रसिद्धी वाढत होती.तेव्हा नागानं तिला तू अभिनय करू असं म्हटलं होतं. यावरून दोघांमध्ये भांडणं झाली. 2021मध्ये दोघांनी सामंजस्यानं घटस्फोटाचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नात्याला पूर्णविराम दिल्याचं जाहीर केलं होतं.

Post a Comment

0 Comments