वडीलांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महेश बाबुला अश्रू अनावर

 

एक काळ गाजवणारे साऊथचे सुपरस्टार व अभिनेता महेश बाबूचेवडील कृष्णा आज या जगात नाहीत.


काल 15 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. पित्याच्या निधनानं महेश बाबू खचला आहे. या वर्षभरात महेश बाबूने आपल्या कुटुंबातील तीन जवळच्या लोकांना गमावलं.


याचवर्षी 8 जानेवारीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. दीडच महिन्याआधी महेश बाबूची आई इंदिरा देवी हे जग सोडून गेली आणि आता पाठोपाठ त्याच्या वडिलांनीही या जगाचा निरोप घेतला. यामुळे महेश बाबू कोलमडला आहे.


 एकापाठोपाठ एक आघात सोसणारा महेश बाबू काल वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी  कोलमडला. त्याला अश्रू अनावर झालेत.


याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत महेश बाबू रडताना दिसतोय. सांत्वन करण्यासाठी आलेल्यांसमोर त्याला अश्रू आवरता आले नाहीत आणि तो सगळ्यांसमोर रडू लागला. 


अर्थात पुढच्याक्षणी त्याने स्वत:ला सावरलं. हा व्हिडीओ पाहून महेश बाबूचे चाहतेही भावुक झालेत. अनेकांनी त्याचं सांत्वन केलं आहे. महेश बाबू खचू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशा शब्दांत अनेक चाहत्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments