ताण-तणावाचा सामना आत्मविश्वासाने करा- डाॅ. संगीता पाटील


पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये "ताण-तणाव व्यवस्थापन" याविषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

दिलेल्या वेळेत काम न केल्यास ताणतणाव वाढत असतो. आळशीपणा हा तणाव वाढण्याचे मुख्य कारण आहे. 


ताण-तणाव व्यवस्थापन करत असताना त्याची कारणे शोधणे आवश्यक आहे.


 आपल्याला काय अडचणी येणार आहेत. यावर अडचणी येण्यापूर्वी नियोजन महत्वाचे आहे.


 विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण-तणाव येत असेल तर नियोजन पद्धत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. 


आत्मविश्वासाने संकटाचा सामना केल्यास यश निश्चित भेटत असते. स्वतःच्या अडचणीवर स्वतःच मात करायला शिका. 


या अडचणी सोडवत असताना तुम्हा आत्मविश्वास मिळत असतो. तोच आत्मविश्वास तुमच्या यशाचे कारण असते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ताण-तणाव येत असतो. 

आलेल्या ताण-तणावाचे आत्मचिंतन करा. ताण-तणाव कमी कराचा असेल तर  योगा सारखे शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण-तणाव आला तर तो दुसर्‍याबरोबर शेअर करणे आवश्यक आहे. 

त्यामुळे आपला  आपला ताण-तणाव कमी होण्यास मदत होत असते. ताण-तणाव टाळायचा असेल तर नकार देता आला पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ताण-तणावाचा सामना


 आत्मविश्वासाने केल्यास यशाचे शिखर तुम्ही गाठू शकतात असे मत डाॅ. संगीता पाटील यांनी सिंहगड कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.

 एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त

 विद्यमानाने "ताण-तणाव व्यवस्थापन" या विषयावर रोटरी क्लबच्या सदस्या डाॅ. संगिता पाटील यांचे मार्गदर्शन सञ आयोजित करण्यात आले होते.

   महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. संगिता पाटील यांचे स्वागत प्रा. अंजली चांदणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

 यादरम्यान काॅलेजचे प्राचार्य, रोटरी क्लब पंढरपूर चे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज, रोटरी क्लब पंढरपूर सह सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments