सासुसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्याची हत्या

 

नवी मुंबई - तुर्भे नाका येथील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या बंगाली व्यक्तीच्या डोक्यावर फरशी मारून त्याची हत्या करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.


मोनू राजकुमार दीक्षित (वय ३३) व हेमेंद्र फेकू गुफ्ता (वय ३८) अशी या दोघांची नावे आहत. 


मृत बंगाली व्यक्तीची मोनू दीक्षित याच्या सासूसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून या दोघांनी ही हत्या केल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.


 या घटनेतील मृत ४० वर्षीय बंगाली इसम तुर्भे उड्डाणपुलाखाली एकटाच राहत होता. तो सकाळी उड्डाणपुलाखाली मृतावस्थेत आढळून आला.


 त्याच्या डोक्यात फरशी व विटांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचे आढळून आल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 


मोनू व हेमेंद्र या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली.


Post a Comment

0 Comments