मृत्यूशी संघर्ष करत असतानाच या अभिनेत्रीला आले हृदयविकराचे झटके

 

अभिनय क्षेत्रात स्टार किड्सना देखील संघर्ष करावा लागतो. त्यांचे कर्तृत्व दिसल्याशिवाय चाहते त्यांना स्वीकारत नाही. हे वास्तव आहे. तर या क्षेत्राच्या बाहेरून आलेल्या नवख्या कलाकारांच्या संघर्षाबद्दल आपण काय बोलणार.


रोज पदरी पडणारी निराशा घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी उत्साहाने काम सुरू करणं याला जिगर लागते. अगदी असाच संघर्ष प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अँड्रीला शर्मा हिने केला आहे. असेच या क्षेत्रात नाव मिळवणारी खूप संघर्षाने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले. 


मात्र करिअरच्या उत्कर्षावर असताना तिचा मृत्यूशी संषर्ष सुरु आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मावर काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान तिला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आल्याने तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. कोलकाता रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला असून तिची प्रकृती खूपच नाजूक आहे.


अभिनेत्री अँड्रीला हिला १ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते, त्यानंतर मेंदूच्या डाव्या भागात फ्रंटोटेम्पोरोपॅरिएटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली होती. एका वृत्तानुसार, अँड्रीलाच्या नवीन सीटी स्कॅन अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचं दिसून आलं. 


जिथं तिचं ऑपरेशन झालं होतं, त्याच भागात गाठी आल्या असून डॉक्टरांनी त्या कमी करण्यासाठी नवीन औषधं दिली आहेत, परंतु तिचा संसर्ग धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. त्यातच तिला हृदयविकाराचे अनेक झटके आले आहेत. प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलंय.


तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सब्यसाची चौधरीने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. त्याने केलेल्या पोस्टवर "मी हे इथे लिहीन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आहे. अँड्रिलासाठी प्रार्थना करा. काही तरी चमत्कार होवो आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा. 

ती खूप अडचणींविरुद्ध लढत आहे," असं सब्यसाचीने म्हणतो. परंबरता चॅटर्जी, जीतू कमल, पौसाली बॅनर्जी, अनिंद्य चॅटर्जी, सुदिप्ता चक्रवर्ती आणि गौरब रॉय चौधरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अँड्रिलाच्या

Post a Comment

0 Comments