सोलापुरात अग्नितांडव, भीषण आगीत अनेक यंत्रमाग कारखाने जळून खाक

 

सोलापूर जिल्ह्यात  सुताच्या कारखान्याला लागलेल्या आगीत अनेक सुताचे कारखाने जाळून खाक


 झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये शनिवारी सायंकाळी सुमारास सदर घटना घडली आहे.


अचानकपणे लागलेल्या या आगीत जवळपास 4 ते 5 कारखाने जळून खाक झाले आहेत. 


कारखान्यांना आग लागताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला फोन केला होता.


 अग्निशमन दल देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आगीवर पाण्याचा फवारा मारत होते.


 पण आगीन रौद्ररूप धारण केले असून आग नियंत्रणात येत नव्हती. अग्निशमन दलाने जवळपास १५ ते २० गाड्यांचा फवारा केला आहे. तरीदेखील आग आटोक्यात येत नव्हती. 


Post a Comment

0 Comments